फैजपूर;- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी २३ रोजी शहरात येत आहे. त्या संदर्भात रावेर- यावल तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नियोजन बैठक फैजपूर येथे आमदार तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात झाली.
आमदार शिरीष चौधरी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले, की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले हे बुधवारी सकाळी ९ वाजता शहरात धनाजी नाना महाविद्यालय परिसरात मेळावा घेणार आहेत. यात प्रामुख्याने केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी काळे कायदे यांचा निषेध करणार आहे. बैठकीत रावेर, यावल तालुक्यातील कार्यकर्त्यांवर कार्यक्रमाची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
स्वागतासाठी होर्डिंग, बॅनरसह रावेर- यावल तालुक्यातील शेतकरीबांधव, पारंपरिक वेशभूषा आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषा यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच कोविड नियम पाळून शिस्तबद्ध कार्यक्रम करण्याचे आवाहन केले. बैठकीस यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, गटनेते कलिम मन्यार, नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, चंद्रशेखर चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, डॉ. सुरेश पाटील, विनायक महाजन, महेश राणे, गुणवंत सातव, भगतसिंग पाटील, अमोल भिरुड, संदीप सोनवणे, नगरसेवक योगेश गजरे, डॉ. राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष शेख रियाज, वसीम जनाब, यावल शहराध्यक्ष कदिर खान, जावेद जनाब, अमोल भिरुड, अनिल जंजाळे आदी उपस्थित होते. गणेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले.