जळगाव (प्रतिनिधी) – माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून बुधवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना हात जोडून आभिवादन केले.
कोरोना झाल्यामुळे २४ ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सर्व चाचण्या झाल्यावर फडणवीस यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णयाला झाला. त्यांच्या सोबत त्यांचे मित्र तथा माजी मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. गिरीश महाजन हे फडणवीस रुग्णालयात दाखल झाले त्या दिवशी देखील त्यांना रुग्णालयात उपचार मिळण्यासाठी दाखल झाले होते. त्यांना डॉक्टरांनी काळजी घेण्याचा व सात दिवस होम कॉरोनटाईनचा सल्ला दिला आहे.