मुंबई (वृत्तसंस्था) – एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर आहे, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आम्ही आजही आवाहन करत आहोत. कोणाच्या तरी सांगण्यावरुन वातावरण खराब होऊ नये.
सन्मानाने संप मागे घ्या. मात्र, एसटीचा संप सुरु आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता व्यवस्था करतोय, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. त्याचवेळी या संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, असे ते म्हणाले.
एसटी कर्मचारी संघटनेच्या ज्या तीन मागण्या आहेत, त्या मान्य केल्या गेल्या होत्या. मात्र विलिनीकरणासंदर्भात नवी मागणी केली आहे. याच्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे कुणीतरी भडकवतोय, म्हणून हे आंदोलन करणे योग्य नाही. उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानंतर समिती स्थापन केली आहे. ही समिती पुढील विचारविनीमय करेल, असे मंत्री अनिल परब म्हणाले.
उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर आहे असं जाहीर करुनही हा संप सुरुच आहे. न्यायालयाने सूचना केलीय की अवमान याचिका दाखल करु शकता. त्यानुसार एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली.