जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील ग.स.सोसायटीच्या समोरच्या भागातील एस.एस.बी. कॉम्प्लेक्समध्ये आज दुपारी अडीच वाजता अचानक आग लागली ही आग अजूनही धुमसतच आहे सायंकाळपर्यंत अग्निशमन दलाच्या ३ बांबांचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते.

महापालिकेचे आतापर्यंत 3 अग्निशमन बंबानी आगीच्या ठिकाणी प्रयत्न सुरु ठेवले आहेत . या मार्केटमध्ये दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली या कॉम्प्लेक्समधील बंद पडलेल्या लिफ्टमधील साचलेल्या कचऱ्याला ही आग आज दुपारी अडीच वाजता लागली होती. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आग लागण्याचे नेमके कारण माहिती नसले तरी आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे बोलले जात आहे . बंद पडलेल्या लिफ्टच्या ठिकाणी साचलेल्या कचऱ्याला आधी आग लागली होती अत्यंत अरुंद जागेत आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचणी येत होत्या.

अग्निशमन दलाचे कर्मचारी रवी बोरसे, भगवान जाधव, दिनेश धर्माधिकारी, विक्रांत घोडेस्वार, वसंत न्हावी, नंदू खडके, सोपान कोल्हे, नासीर अली शौकत अली, संतोष तायडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, नितीन बारी हे आग विझविण्यासाठी परिश्रम घेत आहेत.







