जळगाव (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथील शिवसेना कार्यालयामध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्यातर्फे छत्री वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


जिल्हा प्रमुख हर्षल माने यांनी यावेळी सांगितले की, पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही. पक्षाचा ‘एक विचार, एक झेंडा, एक नेता’ यापेक्षा कोणीही मोठे नाही. उद्धव ठाकरे हे अतिशय हिरारीने आलेल्या कठीण प्रसंगांचा सामना करून उभ्या महाराष्ट्राची सेवा करत आहेत, असेही ते म्हणाले. तसेच उप तालुका प्रमुख रविंद्र चौधरी यांनी, नवे-जुने कार्यकर्ते एकेठिकाणी आल्याचा आनंद आहे. पक्षातील एकी पक्षवाढीसाठी महत्वाची आहे, असेही ते म्हणाले.

विधानसभा प्रमुख जगदीश पाटिल यांनी सांगितले की, पक्ष कोणाचा मालक नाही. कार्यकर्त्याच्या बळावर मोठा होतो. कारण पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही. यावेळी उमर्दे येथील उपसरपंच संदीप पाटिल यांचा व ग्रामपंचयत सदस्य यांचा सत्कार झाला.

कार्यक्रमाला रवींद्र जाधव, सुनील मानुधने, संजय महाजन, प्रसाद दंडवते, रूपेश माळी, अरुण महाजन, संदीप पाटिल, गजानन महाजन,गोपाल महाजन, महेश महाजन, भिका चौधरी, विनोद मराठे, तसेच युवासेना, शिवसेना, शाखा प्रमुख, गटप्रमुख, शेकडो संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचलन प्रमोद महाजन यानी केले.







