एरंडोल (प्रतिनिधी) – येथील गांधी पुरा भागातील मराठी शाळा नं.२ जवळील पुरातन हनुमान मंदिराचा कळस पुजनचा कार्यक्रम हा दि.३१ ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत करण्यात येणार आहे.
यावेळी म्हसावद नाक्या पासुन ते हनुमान मंदिरा पर्यंत शासनाचे नियम पाळून कलश पूजन मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच याप्रसंगी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याचे समस्त गांधीपुरा निवासी यांनी कळविले आहे.







