एरंडोल ( प्रतिनिधी ) – अज्ञात चोरट्यांनी सुटी असल्याची संधी साधून स्वतंञ मायक्रो फायनान्स प्रा.लि. चे येथील वृंदावन नगरातील कार्यालयाचे कुलूप तोडून रोख रक्कम व मोबाइल असा एकूण १३ हजार एकशे ४४ रूपयांचा ऐवज लंपास केला.

या कार्यालयाला रवीवा पर्यंत सलग 3 दिवस सुटी होती, व्यवस्थापक व कर्मचारी १३सप्टेंबररोजी सकाळी कार्यालय उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे त्यांना आढळुन आले.
जुन्या धरणगाव – कासोदा रस्त्यालगतच्या वृंदावननगरात स्वतंञ मायक्रोफायनान्स लिमीटेडचे कार्यालय आहे. येथील कर्मचारी 3 दिवस कार्यालयास सुटी असल्यामुळे गावी गेले कार्यालयाची चावी मँनेजर नितीन सुरवाडे यांच्याकडे होती. सोमवारी सकाळी मँनेजर सुरवाडे कर्मचार्यांसोबत कार्यालय उघडण्यासाठी गेले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले, कार्यालयातील कपाट उघडलेले, वस्तू इतस्तत: पडलेल्या दिसून आल्या कपाटात ठेवलेली पाच हजार एकशे चौरे चाळीस रूपयांची रोकड व मोबाइल चोरीस गेल्याचे लक्षात आले. एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.







