एरंडोल ;- नगरपालिका येथे प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना उपाययोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी उद्योजक यांनी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मुकेश चौधरी यांनी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात लोकवर्गणीतून काय काय करता येईल उपाय योजना व व काय मदत मिळावी अजून काय करावे लागेल यासंदर्भात माहिती दिली. एरंडोल मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष व दिव्य मराठी वृत्तपत्राचे पत्रकार संजय चौधरी त्यांनीदेखील सर्व उद्योजकांना शिक्षक संघटनेला व व्यापाऱ्यांना त्यांच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्मरण पत्र देवून जास्तीत जास्त ग्रामीण रुग्णालयाला डुऱ्यासिलेंडर व इतर साहित्य मिळण्याबाबत त्यांनी दानशूर व्यक्तींना मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन केले. गरीब व सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट होऊ नये . त्यांना ग्रामीण रुग्णालयात चांगली ट्रीटमेंट व दर्जेदार सुविधा मिळावी असे त्यांचे प्रयत्न आहेत..त्यांच्या पत्राची दखल घेऊन सर्वांनी त्यांना प्रतिसाद देऊ केला.. याप्रसंगी एरंडोल नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशभैय्या परदेशी यांनी देखील नगरपालिकेतर्फे मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले.. व लोकांनी देखील मदत करावी असे आवाहन केले … व काही उद्योजकांची फोनवर चर्चा करून मदत करण्यास सांगितले… व उद्योजकांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन आश्वासन दिले…तसेच भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ चौधरी यांनीदेखील व्यापाऱ्यांकडून मदत केली जाईल असे आश्वासन दिले. व इतर उद्योजकांना देखील फोनवर बोलून मदत करण्यास सांगितले.. प्रांतअधिकारी शी उद्योजकांचे बोलणे करून दिले…. याप्रसंगी एरंडोल तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विजय अण्णा महाजन यांनी देखील सांगितले की आम्ही एरंडोल शहराच्या नागरिकांच्या बाबतीत बिलकुल ही तडजोड न करता लोकांचा जीव कसा वाचेल त्यांना चांगले आरोग्य सेवा मिळण्यासाठी आमचे प्रयत्न चालू राहतील यासंदर्भात आम्ही कुठेही कमी कमी न पडता पैशाने देखील कमी पडू देणार नाही आमच्याकडून देखील मदत केली जाईल असे आश्वासन केले दिले… या ठिकाणी भाजपचे जिल्हा संयोजक आणि नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकूर यांनीदेखील त्यांच्या मनातील खंत व्यक्त करत मी कुठलाही मदतीला कधीही आपल्या एरंडोल शहरातील नागरिकांसाठी तत्पर राहील व व एरंडोल येथे लवकरात लवकर ऑक्सीजन प्लांट येणे महत्वाचे आहे. अशी त्यांनी मागणी केली. व माझ्याकडून देखील जी मदत करता येईल की मी करतच राहील मी जनतेशी बांधिलकी आहे. एरंडोल नागरिकांसाठी कुठे कमी पडतात केव्हाही उभा राहील असे आश्वासन दिले.
याप्रसंगी एरंडोल माध्यमिक शिक्षकांनी देखील दोन लाखाची मदत जाहीर केले व अजून कमी पडल्यास आम्ही अजून मदत करू असे आश्वासन माध्यमिक शिक्षकांचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन यांनी देखील मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगीमनसे एरंडोल तालुका अध्यक्ष विशाल सोनार,युवा उद्योजक पंकज काबरा, माजी नगरसेवक डॉ नरेंद्र पाटील, नगरसेवक कुणाल महाजन मराठी पत्रकार संघाचे संयोजक माजी उपनगराध्यक्ष व माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शालिग्राम गायकवाड ,मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सदस्य व सकाळचे पत्रकार अल्हाद जोशी यांनी देखील मदत करण्याबाबत व उद्योजकांशी बोलून मदत करावी असे आवाहन केले आहे.. एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर काबरा प्रकाश चौधरी देशदूतचे पत्रकार जावेद मुजावर, नगरपालिकेचे अधीक्षक हीतेश जोगी, माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी पत्रकार बांधव शहरातील व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







