जळगाव ( प्रतिनिधी ) – वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने सर्पदंशावर तातडीने आणि योग्य उपचार न मिळाल्याने त्या मुलाचा मृत्यू झाला म्हणून रावेर तालुक्यातील ऐनपुरच्या प्रार्थमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप चौरे यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशा मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , मोहित विनोद पवार या मुलाला सर्पदंश झाल्याने ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता पालकांनी ऐनपुरच्या प्रार्थमिक आरोग्य केंद्रा आणले होते त्यावेळी तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप चौरे उपस्थित नसल्याने अन्य कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या डॉक्टरला बोलावून तात्पुरते उपचार करीत रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते. दुसरे डॉक्टर डॉ चंदन पाटील यांनीही त्या मुलाला सर्पदंशाचे उपचार न करता दुसऱ्याच औषधांचे डोस दिले होते. त्यामुळे या सर्व प्रकारात योग्य आणि तात्काळ उपचार न मिळाल्याने तो मुलगा दगावला होता.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना हा प्रकार कळविला गेला होता. मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी पाठीशी घालत आहेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील यांचीच नियुक्ती नियमबाह्य पद्धतीने झालेली आहे. आता त्यांनीच डॉ संदीप चौरे यांची राजा मंजूर करून त्यांना रजेवर पाठविलेले आहे. या सगळ्या प्रकारची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.