जळगाव ( प्रतिनिधी ) – औरंगाबाद रोडवरील कंडारी फाट्याजवळच्या एमको कंपनीतून सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या पर्यवेक्षकांनीच ७३ हजारांच्या इलेक्ट्रिक मोटारी , अल्युमिनियम व्हील्सची चोरी केल्याची फिर्याद एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे

एमको कंपनी ( सिध्दार्थ इंदूस्ट्रीज ) सध्या न्यायालयाच्या अवसायकांच्या ताब्यात आहे सुरेन्द्र भट हे या कंपनीचे अवसायक आहेत . या कंपनीला सुरक्षा रक्षक पुरविण्याचा ठेका घेतलेल्या पब्लिक सिक्युरिटी अँड प्लेसमेंट कंपनीचे अनिलकुमार वर्मा ( रा – व्हीपीओ क्वार्टर , हरयाणा ) यांनी दाखल केलेल्या या फिर्यादीत म्हटले आहे की ., ५ ऑक्टोबररोजीच्या रात्रीपासून उत्तररात्रीच्या ( ६ ऑक्टोबररोजीच्या ) पाऊण वाजेपर्यंत राजकिशोर पटेल , अशोक पटेल ( दोघे रा – शेरवार बामनौली , उत्तर प्रदेश ) , प्रीतमकुमार मौर्य ( रा – चुहीया , उत्तरप्रदेश ) , शशिकांत सतीराम ( रा – बहाईपुर , उत्तर प्रदेश ), सुग्रीवकुमार रामप्रसाद ( रा – मैनी , उत्तर प्रदेश ) , तारकेश्वर पटेल ( रा – मोचीपूर , उत्तर प्रदेश ), रजनीश पटेल , ( रा – कोपरखैरणे , ठाणे ), धर्मेंद्र सैनी ( रा – ओलमथुरा , उत्तरप्रदेश ) या आरोपींनी ही ७३ हजारांच्या इलेक्ट्रिक मोटारी , अल्युमिनियम व्हील्सची चोरी केली आहे . या आरोपींच्या विरोधात गु र न ६७७ / २०२१ भा द वि कलम ३८१ व ३४ नुसार एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास स पो नि प्रमोद काठोरे करीत आहेत.







