जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. ज्योती परब यांच्या चित्रमय रामायण पुस्तकाचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातील प्रसंग रेखाटन करणारे जळगावचे राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक एल.झेड.कोल्हे यांना अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘कलागौरव पुरस्कार-२०२१’ प्रदान करण्यात आला .
मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून प्रयत्नशील लेखिका व संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब यांनी हे चित्रमय रामायण लिहिले आहे वाचन प्रेरणा दिन (भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती ) आणि दसरा याचे औचित्य साधून पुणे येथे छोटेखानी प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
पुस्तक प्रकाशन समारंभासाठी साहित्य गौरव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर , महाकवी कालिदास संस्थेचे संस्थापक वि. ग. सातपुते , ज्येष्ठ कवियत्री मंदा नाईक , उर्मिला कराड , दिवाकर घोटीकर, पत्रकार हेमंत नेहेते, हिंदीचे अभ्यासक प्रा. महेंद्रदास ठाकूर, डॉ राज परब, प्रा.योगेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.