जळगाव विमानतळाजवळच घटना घडल्याने मोठा अपघात टळला
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावात आले असता मंगळवारी दि. १३ ऑगस्ट रोजी त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला. एका एस्कॉर्ट कारने अचानक ब्रेक लावल्याने एकामागील एक अशा मागून तीन वाहने एकमेकांना धडकल्या. यात कोणीही जखमी झाले नसून मात्र हि घटना मुख्य रस्त्यावर धावताना झाली नसल्याने मोठा अपघात टळला आहे.
जळगाव शहरात “माझी लाडकी बहीण” योजनेनिमित्त मेळावा सागर पार्कवर घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विमानतळावर मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री आल्यावर त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले. (केसीएन)त्यानंतर कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांचा ताफा निघत असताना विमानतळ परिसरातच एक एस्कॉर्ट कार ( एमएच १९ सीव्ही १३३४) च्या चालकाने अचानक ब्रेक दाबले.
यामुळे मागील तीन कार त्यात लगेज कार (एमएच १९ एम ७५७), जळगाव पोलिसांची ‘टेल’ कार आणि महाराष्ट्र शासन पाटी असलेली इनोव्हा कार (एमएच ०५ डीयू ९४५) ह्यादेखील एकमेकांना धडकल्या.(केसीएन)इतर स्कॉटमध्ये वाहनाचा ताफा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना घेऊन पुढे सभेठिकाणी रवाना झाला. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे. तर कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनांना पुढे बाजूला करून उर्वरित ताफा कार्यक्रमस्थळी रवाना झाला. दरम्यान, हा अपघात धावत्या रस्त्यावर झाला असता तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र अपघात विमानतळ परिसरात झाला.