भाजपामध्ये अनौपचारिक प्रवेश झाल्याचे खडसे यांचे वक्तव्य ; मोठी जबादारी मिळण्याची शक्यता
जळगाव /नवी दिल्ली ;-माजीमंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांची स्नुषा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली असून सोशल मीडियावर याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्याने खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले आहे . गुरुवारी हि भेट झाली आहे. मात्र याभेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी हि अत्यंत महत्वाची भेट मानली जात आहे. दरम्यान एकनाथराव खडसे यांनी अनौपचारिक प्रवेश झाला असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे .
भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर एकनाथराव खडसे यांना मोठे पद मिळण्याची शक्यता असून त्यांचा भाजपामध्ये येण्याचा प्रवेश रखडलेला असल्याचे म्हटले जात होते. मात्र त्यांनी गुरुवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची नेमकी माहिती नसली तरी एकनाथराव खडसे यांनी लोकसभा निवडणुकीत स्नुषा असलेल्या रक्षा खडसे यांना पाठिंबा देऊन प्रचारातही सहभाग घेतला होता.
भाजपमध्ये घरवापसी होताच एकनाथ खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. पक्षात प्रवेशानंतर खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. एकनाथ खडसे आधी भाजपमध्ये होते, त्यांना पक्ष वाढीसाठी मोठं काम केलं आहे. त्यांना भाजप आणि संघाची रणनीती माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.