जामनेर (प्रतिनिधी) :- येथील जामनेर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप बळीराम खोडपे यांना एकलव्य आदिवासी युवा संघटनेने पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे.
महाविकास आघाडीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप बळीराम खोडपे यांना सर्व जाती-धर्माच्या नागरिकांकडून प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे लोकप्रिय ठरत असलेले उमेदवार दिलीप खोडपे यांना विजयी करण्याचे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात येत आहे.