गावात सलोख्याचे वातावरण
शिरसोली ( वार्ताहर ) – पवित्र रमजान ईद निमित्ताने शिरसोली प्र. बो. आणि प्र. न. येथील मुस्लिम समाजबांधवांकडून शिरखुर्मा पार्टीचे आयोजन जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ करण्यात आले होते. त्यात सर्व समाजबांधवांनी उपस्थिती दर्शविली.
यावेळी गळाभेट आणि शिरखुर्मा घेऊन सर्व समाजबांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करून सणाचा आनंद लुटला आणि सोबतच एकतेचा संदेश देखील दिला. यामुळे दोन्ही गावात सामाजिक सौहार्द व सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसंगी अनेक मान्यवरांची या वेळेला उपस्थिती होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.