जळगाव (प्रतिनिधी) – प्लॉट, फ्लॅट, घर, तसेच व्यापारी गाळे आदींच्या खरेदी विक्रीची नोंदणी आता ‘ई-रजिस्ट्री’ च्या माध्यमातून घरबसल्या करू शकणार आहे. राज्य सरकारसह बांधकाम क्षेत्रातील संस्था “क्रेडाई” ने यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबतची माहिती बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यशाळेत शासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-रजिस्ट्री घर बसल्या कशी करावी याबाबत सविस्तर माहिती एनआयसीचे मनीष सर यांनी दिली. कार्यक्रमासाठी नाशिक विभागचे नोंदणी उपमहानिरीक्षक विजय भालेराव, सह जिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र गायकवाड, सह जिल्हानिबंधक सुनील पाटील, क्रेडाई संस्थेचे महाराष्ट्र सहसचिव अनिष शहा, जळगावचे अध्यक्ष हतीम अली, सचिव दीपक सराफ, आयजीआर कमिटीचे निर्णय चौधरी, प्रवीण खडके, पाचोरा अध्यक्ष संजय कुमावत, चाळीसगावचे सुनील बंग व क्रेडाईचे सर्व पदाधिकारी तसेच ऍड. सुनील तारे, ऍड, पुष्कर नेहते आदी उपस्थित होते.