पारोळा तालुक्यातील धुळपिंप्रीजवळची घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- येथील कासोदा रस्त्यावरील धूळपिंप्री गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडली. पारोळा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
याबाबत एरंडोल तालुक्यातील निपाणे जवळील जवखेडे येथील अशोक शेनफडू कोळी (वय ४५), अमृत मधुकर सोनवणे (वय ३४) हे त्यांच्या मोटरसायकलने कासोदाकडे जात होते. तेव्हा समोरून कासोद्याकडून पारोळ्याकडे येणारा बंडू कुवर पवार (वय २९ भातखंडे) या दुचाकीस्वाराशी धुळपिंप्री गावाजवळ समोरासमोर धडक झाली. त्यात तिघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. जखमींना ग्रामस्थांनी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले. पारोळा कुटीर रुणालयात त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून जळगाव येथे हलवण्यात आले आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरु होते.