पारोळा शहरात धरणगाव चौकाजवळील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – धरणगाव चौफुलीजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पारोळा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सूरज शामदास ठाकरे (सबगव्हाण खु, ता. पारोळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सूरज हा दुचाकी (एमएच५४/डी६३४७) ने जात असताना महामार्गावरील धरणगाव चौफुलीजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला. त्यास पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अज्ञात वाहनचालक हा वाहन घेऊन पसार झाला आहे. याबाबत रोहिदास ठाकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









