तीन जण ताब्यात ; यावल पोलिसांची कारवाई
यावल(प्रतिनिधी ) : श्री. क्षेत्र मनुदेवी येथून दर्शन घेऊन परत येत असतांना दुचाकीचा धक्का लागल्याने दुचाकीस्वारांनी तरुणासोबत वाद घातला. या वादातून तरुणावर दुचाकीस्वारांनी प्राणघातक हल्ला करीत गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी घडली होती. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासचक्रेफिरवून एमआयडीसी परिसरात लपून बसलेल्या तिघ हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या,
या हल्ल्यात जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार आहेत. तालुक्यातील आडगाव येथे मनूदेवी मंदिर आहे. याठिकाणी प्रशांत किशोर धनगर (वय २१ रा. चहार्डी ता. चोपडा) हा तरुण आला होता. दरम्यान तो परत जात असतांना शनी मंदिरा जवळील फॉरेस्टच्या गार्डन समोर दुचाकीचा धक्का लागला. म्हणून दुचाकी (क्रमांक एम. एच.१९ डी. यु. ६९१३) वरील तीन अज्ञात तरुणांसोबत त्याचा वाद झाला.
या तरुणांनी त्याला शिवीगाळ करून थेट मारहाण सुरु केली आणि त्यातील एकाने धारदार चाकूने प्रशांत धनगर यांच्या पोटावर वार केला. या हल्ल्यानंतर दुचाकी वरील हे तिघे तरुण तेथून फरार झाले. जखमी प्रशांत धनगर याला तातडीने जळगाव येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. याप्रकरणी विवेक धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सागर कोळी करीत आहे.
तिघांना घेतले ताब्यात
तिघा हल्लेखोरांच्या आवळल्या मुसक्या मध्यरात्री तिघांना घेतले ताब्यात या गुन्ह्यातील संशयित चेतन संभाजी सोनवणे, खुशाल शत्रुधन कोळी व सुरज नाना पाटील हे तिघे एमआयडीसीच्या परिसरात एका घरात लपून बसले होते. मध्यरात्रीनंतर पोउनि सोपान गोरे, सहायक फौजदार असलम खान, अर्शद गवळी, वसीम तडवी, सागर कोळी या पथकाने मध्यरात्री तिघांना ताब्यात घेतले आहे.