पोलीस यंत्रणेचा धाक नसल्याने दुचाकीचालकांसाठी डोकेदुखी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात दुचाकी चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून त्यांच्याकडून शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करीत आहे. सोमवारी दिवसभरात शहरातील विविध भागांमधून तब्बल सात दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहे. शहरातील बहुतांश परिसर हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असतांना देखील पोलिसांच्या नाकावर टिच्चून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र दुचाकी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजिंठा चौफुली परिसरातून विजय सुरेशसिंग राजपूत (वय ४२, रा. सिकवालनगर) यांची (एमएच १९, बीएस ३४२५) क्रमांकाची तर सुप्रिम कॉलनीतील अमजद अजीत खाटीक यांची (एमएच १९, डीके १५०१) क्रमांकाची तर तिसरी घटना ही ईश्वर कॉलनीत घडली असून येथून सचिन सुरेश पाटील रा. चिंचोली यांची (एमएच १९, डीऐ ६९१६) क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. तसेच रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओजीस्विनी हॉटेलच्या समोरुन महेश मुलचंद सोन्त्री (रा. मयूरकॉलनी) यांची (एमएच १९, डीएक्स ९८९५) क्रमांकाची तर दुसरी घटना गणपती नगरातील सुरेश फुड येथे घडली.
याठिकाणाहून पंकज भटू पवार (वय ४६, रा. कोठारी नगर) यांची (एमएच १९, सीएस ७१२०) क्रमांकाची तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोलाणी मार्केट परिसरातून अमित गोर्धनदास अरेजा यांची (एमएच १९, बीटी २०३०) क्रमांकाची तर शनिपेठ पोलीस ठाण्या हद्दीतून संजीव गोंविदा चौधरी यांची (एमएच १९, बीएल ५९४९) क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली.
विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन, रामानंद नगर पोलिसांच्या हद्दीतून दोन तर शहर व शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक अशा एकूण सात दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहे. त्यामुळे या दुचाकी चोरटयांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.