जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील नवी पेठ येथील सेंट्रल बँकेच्या बाहेर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस
आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल जमनादास यादव (वय-३४) रा. नामदेव नगर, एकमुखी दत्त मंदीरामागे, पिंप्राळायांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीसी ४६८३) क्रमांकाची दुचाकी
आहे. शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० शहरातील नवीपेठ येथील सेंट्रल बँकेसमोर दुचाकीने आला. जवळच दुचाकी पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले.
परिसरात सर्वत्र शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर शनीवार १३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार
दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.