एलसीबीची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :– स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुक्यातील दोघांना अटक केली आहे. दोघांची विचारपूस केली असता त्यांनी चोरीच्या ३ दुचाकी काढून दिल्या आहेत. त्यांच्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि चोरट्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम आखण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी पथक रवाना केले होते. पथकाने जळगांव तालुक्यातील रिधुर गावातील दोन संशयीत आकाश गोरखनाथ सोनवणे (वय २३) व मयुर भगवान कोळी (वय-२१) यांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीच्या ३ दुचाकी काढून दिल्या आहेत. तसेच त्यांचा आणखी एक साथीदार देखील निष्पन्न झाला आहे.
कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील हवालदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, महेश महाजन, बबन पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील, महेश सोमवंशी यांनी केली आहे. पथकाला कारवाईत तालुका पोलीस ठाण्याचे अंमलदार रामकृष्ण इंगळे व अभिषेक पाटील यांनी मदत केली असून तिन्ही दुचाकी अमळनेर शहरातून चोरी केल्या आहेत. चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.