जळगाव (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून चोरीच्या दुचाकी घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपीला चोपडा शहरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी तपास करण्याचे एलसीबीला आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ संदीप पाटील, अश्रफ शेख, दिपक पाटील. पो.ना. प्रविण मांडोळे, पो.कॉ. परेश महाजन, हेमंत पाटील, प्रमोद ठाकूर यांनी सोमवारी ३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता कारवाई केली.
संशयित आरोपी दिपक सुमऱ्या बारेला (वय-२७) रा. कर्जाणा ता. चोपडा याला चोपडा शहरातील कारगील चौकातून सापळा रचुन अटक केली. त्यांची चौकशी केली असताना त्यान चोरीच्या तीन दुचाकी काढून दिल्या. या मोटारसायकली त्याने जळगाव, धरणगाव आणि भडगाव तालुक्यातून चोरल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.