जळगाव ;– दुचाकी चोरीच्या घटना अलीकडे वाढल्या असून पुन्हा दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली असून येथील सम्राट कॉलनी परिसरातून तरूणाची ३० हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली.
मुक्तार शेख हुसेन (वय-२९) रा. जुना मेहरूण रोड तलाठी कार्यालयाच्या मागे जळगाव, किरकोळ विक्रीचे काम करून उदरनिर्वाह करतात. २६ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ते शहरातील सम्राट कॉलनीतील डायमंड हॉल समोर आपली दुचाकी लावून शनिवारचा बाजार करण्यासाठी गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. सायंकाळी ६ वाजता बाजार करून परत दुचाकीजवळ मुक्तार हे आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून मिळून आली नाही. याप्रकरणी मुक्तार शेख हुसेन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.








