जळगाव (प्रतिनिधी)- धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एस. टी . ) या प्रवर्गामध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी दि. ६ ऑक्टोबर रोजी एकलव्य संघटनेतर्फे दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे.
एकलव्य संघटनेतर्फे निदर्शन करण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनला एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, तसेच तालुकाध्यक्ष मंगलसिंग सोनवणे यांनी निवेदन दिले आहे. यावेळी निदर्शन करतांना शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टंसिंग ठेवण्यात येणार आहे.