जळगाव ( प्रतिनिधी ) – भारताचे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
त्यानिमित्ताने डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयातील ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून त्यांच्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन केले. डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस प्राचार्या प्रा. कविता देशमुख यांनी फुलगुच्छ अर्पण करून अब्दुल कलाम यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले तसेच कु. कोमल कोळी हिने अब्दुल कलाम यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास ग्रंथपाल प्रा.कविता भोरटके एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री. मीनल राणे एन.एस.एस ऑफिसर प्रा.जयश्री कुलकर्णी प्रा.स्वाती जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.