जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालय व रुग्णालयात दिपोत्सवाला प्रारंभ झाला असून शुक्रवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीनिमित्त धन्वंतरी पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासन अधिकारी राहूल गिरी यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थीत होते. यावेळी ओपीडीतील उपयुक्त वस्तुचे पुजन डॉ.उल्हास पाटील यांचे हस्ते करण्यात आले. आगामी काळात जास्तीत जास्त अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्याची घोषणा यावेळी डॉ.उल्हास पाटील यांनी केली.