जळगाव – भारतीय संस्कृती विविधतेने सजली असून भावी वैद्यकिय तज्ञांनी हया संस्कृतीचे जतन करत असून १४ नोव्हे रोजी बालदिवस उत्सहात साजरा करण्यात आला.
यावेळी बालरोग विभागात दाखल झालेले रूग्ण व त्यांच्या नातेवाईकासह बालरोग तज्ञ विभागप्रमुख डॉ. अनंत बेंडाळे,डॉ उमाकांत अणेकर,डॉ. सुयोग तन्नीरवार डॉ. भारती झोपे, डॉ. चंदाराणी, डॉ. ओमश्री गुडे,डॉ. कुशल धांडे, हिरामण लांडगे, यांचेसह बालरूग्ण व नातेवाईक मोठया उत्साहाने सहभागी झाले होते.यावेळी बालरोग वार्डमध्ये फुग्यांची आकर्षक सजावट केली होती.विविध मनोरंजनाचे खेळ व गाणी देखिल लावण्यात आली तसेच बालरूग्णांना खाउ व भेटवस्तुचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी बालरोग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.