जळगाव — येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या अन्नपुर्णालयम येथे प्रभु श्री रामनवमीनिमीत्त वैद्यकिय अधिक्षक डॉ.पे्रमचंद पंडीत यांनी सपत्नीक पूजन केले तर डॉ. उल्हास पाटील यांचे हस्तेही पूजन करण्यात आले.
गोदावरी फॉउंडेशनचे राजपूरोहीत डी टी राव यांनी मंत्रघोषात डॉ प्रेमचंद पंडीत यांनी सपत्नीक विधिवत अभिषेक व पूजा केली तर माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते देखिल पूजा करण्यात आली. यावेळी वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,प्रशासन अधिकारी, आणि कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थीत होता. पूजनानंतर प्रभु श्री रामाचा जयघोषाने परिसर दणाणून गेला.
प्रभुरामचंद्राचा आदर्श प्रत्येकाना अंगी बाळगावा — डॉ. उल्हास पाटील
संपुर्ण देशात राममंदिर लोकार्पणामूळे आनंदोत्सव साजरा केला जात आहे. श्री प्रभुरामचंद्रानी आपल्या वडीलांच्या वचनपुर्तीसाठी वनवास स्विकारला,माता पिता भक्ती आणि प्रेमाचे प्रतिक आहे त्यामूळे त्यांचा आदर्श प्रत्येकाने डोळयासमोर ठेवावा असे यावेळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.