जळगाव (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खा. डॉ. उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून गोदावरी फाउंडेशनतर्फे १७ सप्टेंबरपासून स्वस्थ माता, सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवेचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यात दि. १७ रोजी जळगाव तालुक्यातील कडगाव, भुसावळ, नशिराबाद आणि जळगाव विमानतळ येथे आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीरात ४४२ नागरिकांची तपासणी व १७६ दात्यांनी रक्तदान केले. गोदावरी फाउंडेशनतर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके,नोडल ऑफीसर वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनानुसार कडगावात डॉ. अनुजा, भुसावळात डॉ.पल्लवी, नशिराबादेत डॉ. सई,डॉ.दिव्या, डॉ एश्वर्या, डॉ. प्रसाद, डॉ.पंकज, डॉ. अभिजित आणि डॉ. आवेश तर जळगाव विमानतळ येथे डॉ. हुषीकेष, डॉ.अभिजित, डॉ.सुशांत, डॉ. करूणेश,श्रुती,डॉ. सायली,डॉ. मंजिरी,डॉ. श्रध्दा, डॉ. प्रज्वल,डॉ. राशी यांनी तपासणी केली.या शिबिरासाठी रविंद्र तनवर, अमोल चौधरी, रितेश वारके, राज सोनवणे, लक्ष्मण पाटील, रूपेश कुळकर्णी, संदीप निकुंभ,भावेश शेळके, दिनेश भोळे, यश पाटील आणि यश वाघ यांनी परिश्रम घेतले.दि. १८ रोजी भुसावळ, तालुक्यातील कढोली व खडका येथे शिबिराचे आयोजन केले आहे.
भाजप जिल्हा पूर्वच्या सरचिटणीस डॉ केतकी पाटील यांनी केला रक्तदात्यांचा सन्मान
पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसापासून भाजपा द्वारे सेवा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त गोदावरी फाऊंडेशन च्या संचालिका तथा जळगाव पूर्व च्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांनी गोदावरी फाऊंडेशन मधील आरोग्य यंत्रणेला सूचित करून १७ सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यास सांगितले. त्या पार्शवभूमीवर आज जळगाव शहरातील विमानतळ, यावल, नशिराबाद येथे आरोग्य तपासणी तर भुसावळ येथे तेरापंथ व जैन मंदिर येथे तसेच कुर्हे पानाचे व कड्गाव याठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले. डॉ केतकी ताई पाटील यांनी भुसावळ येथे भाजप व तेरापंथ मंडळाद्वारे आयोजित शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा सन्मान केला.