जळगाव – डॉक्टर गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मध्ये क्रिडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फॉउंडेशन उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्य हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ एन.एस.आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के मिश्रा, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर.गोदावरी नर्सिगच्या प्राचार्या.विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंगचे संचालक शिवानंद बिरादर आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले डॉ. निखिल चौधरी, डॉ. साजीया शेख,डॉ. उमाकांत चौधरी,डॉ तायडे, डॉ. मयुरी चौधरी,डॉ. कोमल पाटील, डॉ. पालवी चौधरी, डॉ. श्रेया पंडीत, डॉ.अमीता निकम यांचेसह सर्व डॉक्टर प्राध्यापक उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळांच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीत अधिक जागरूक होण्याचे आवाहन केले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे आणि पारितोषिके देण्यात आली. यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी चेतन चौधरी ,मोहीत येवले,महाविद्यालयातील क्रीडा समितीने अथक परिश्रम घेतले.