जळगाव (प्रतिनिधी) :- मॅक्रोव्हिजन ॲकॅडमी स्कूल, रावेर येथील शिक्षणप्रेमी डॉ.प्रदीपकुमार कळसकर यांना डॉ.राधाकृष्णन शिक्षण स्वयं सहायता समुह द्वारा सिकंदराबाद, हैदराबाद येथील ग्रैंड कॉन्टिनेंट होटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रीय डॉ.राधाकृष्णन शिक्षक पुरस्कार २०२४ ने सम्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम दि. ३ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे (इग्नू) प्रादेशिक संचालक डॉ.के. रमेश आणि डॉ.राजीव सिंग यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत देशभरातील १०२ शिक्षकांना गौरविण्यात आले. यावेळी शिक्षक बचत गटाचे संस्थापक डॉ.अजितकुमार चौहान, सहसंस्थापक भोला सिंग आदींच्या हस्ते डॉ.प्रदीपकुमार कळसकर यांना सम्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात भारतातील २६ राज्यातील सुमारे १०२ प्रतिभावंतांचा गौरव करण्यात आला. डॉ.प्रदीपकुमार कळसकर हे गेली १७ वर्षे सातत्याने हिंदी विषयाचा प्रचार-प्रसार तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये चर्चासत्रे आयोजित करून शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत. आत्तापर्यंत डॉ.प्रदीपकुमार कळसकर यांना शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील अनेक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.