जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले हे १५ दिवसांच्या हिवाळी सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा भार तसेच वैद्यकीय अधिक्षक पदाचा प्रभार १५ दिवस उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण यांच्याकडे आला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांसाठी दोन टप्प्यात हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले हे सुट्ट्यांच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच २५ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत गावी गेले आहेत. त्यांचा पदभार दंतशल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. इम्रान पठाण यांच्याकडे आला आहे. त्यांच्यासह दुसरे उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. विलास मालकर हे रुग्णालयाचा कारभार सांभांळत आहेत.