प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले नियुक्तीपत्र
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस डॉ.नितीन वसंतराव पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
कोरोना काळात केलेले कार्य असो,किंवा सांगली, कोल्हापूर च्या पूरस्थिती मध्ये जाऊन घेतलेले कॅम्प असतील,किंवा जळगाव जिल्ह्यात वेळोवेळी घेतलेले आरोग्य शिबीर असेल किंवा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना रुग्ण सेवेचे मार्गदर्शन व सहकार्य असेल, अशा सेवेमुळे डॉ.नितीन पाटील यांना डॉ.सेलचे प्रदेश कार्यकारिणी ने बढती दिली. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच कार्यकारिणीला मंजुरी दिली.
डॉ.सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.सुनील जगताप यांनी हि नियुक्ती जाहीर केली. निवडीबद्दल एकनाथराव खडसे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी पालकमंत्री डॉ.सतिष पाटील,जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्र पाटील माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार राजीव देशमुख, राज्याचे नेते डॉ.नरेंद्र काळे व डॉ.राहुल सूर्यवंशी, माजी जि.प.सदस्य संजय गरुड यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केले आहे.