जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटल यांची मेगा सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगाव मध्ये सुरु झाली असून येत्या ७ जानेवारीरोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य रुग्णांची तपासणी करणार आहेत .
रुग्णांनी आपल्या गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, न जुळलेली हाडे मणक्याचे “स्पिप डिस्क” सारखे आजार तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि
दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे. हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता या संधीचा लाभ घ्यावा
आणि योग्य उपचार व तपासणीसाठी नाव नोंदणी करावी , असे आवाहन लोकमान्य हॉस्पिटल यांच्याकडून करण्यात आले आहे .
०७ जानेवारीरोजी आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँण्ड डायग्नोस्टिक सेंटर, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, ( जळगाव ) येथे
सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे . तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी रुग्णांनी 9673859185 किंवा 8668794817 या क्रमांकांवर संपर्क साधावा.