महाराष्ट्र योगा असोसिएशनचे डॉ. मयुरी करणार प्रतिनिधीत्व
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील डॉ. मयुरी महेंद्र तेलंग यांची कोलकाता येथील हुगळी येथे होणार्या ४८ व्या सिनीयर राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
जळगाव येथे राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील डॉ. मयुरी महेंद्र तेलंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत तृतीय क्रमांक पटकविला होता. पश्चिम बंगालच्या हुगळी येथे २१-२५ वयोगटातील ४८ वी सिनीयर राष्ट्रीय योगासन स्पर्धा दि. १९ ते २३ मार्च या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील तीन खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातून एकमेव डॉ. मयुरी महेंद्र तेलंग यांची या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
डॉ. मयुरी ह्या महाराष्ट्र योगा असोसिएशनचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यांना महाराष्ट्र योगा फेडरेशनच्या अध्यक्षा डॉ. अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. डॉ. मयुरी महेंद्र तेलंग यांच्या या यशाबद्दल या निवडीबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. वैभव पाटील यांनी त्यांचे कौतुक केले आहे.