जळगाव (प्रतिनिधी) – येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी डॉ. किरण बळीराम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनातर्फे सोमवारी याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
डॉ. किरण सोनवणे अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत बधिरीकरण विभागात (भूलशास्त्र) त्यांनी सेवा दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सोमवारी ८ डॉक्टरांना जिल्हा शल्य चिकित्सक या संवर्गात पदस्थापना देण्यात आली आहे. त्यात डॉ. किरण सोनवणे यांना वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.