माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी केले अभिनंदन
जळगाव – येथील डॉ. अमित किरण राणे हे डिआर.एन.बी. (सुपर स्पेशालिटी व्हॅस्कुलर सर्जरी) ही डॉक्टरेट परीक्षा विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गोदावरी फॉउंडेशनचे संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांनी त्यांच्या यशाबददल अभिनंदन केले आहे.
या यशाबद्दल माजी खासदार व गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी म्हटले आहे की, रक्तवाहिन्यातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व गुंतागुंत टाळण्यासाठी केली जाणारी ही शस्त्रक्रिया असते. यात डॉक्टरेट मिळविणे हे भूषणावह आहे. मी डॉ. अमित यांचे अभिनंदन करतो. आपल्या या ज्ञानाचा फायदा खान्देशातील रुग्णांना व्हावा, या उद्देशातून ते दर पंधरा दिवसातून दोन दिवस जळगाव येथे सेवा देणार आहेत. त्यांनी त्यांचे एम.बी.बी.एस हे शिक्षण मिरज येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. सध्या ते पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. ते येथील उद्योजक किरण राणे व प्रा.डॉ. प्रतिभा राणे यांचे पुत्र आहेत.