जळगाव शहरात जीवन नगर, नंदनवन कॉलनीत घडली घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात सोलर कंपनीच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप चोरुन नेला. ही घटना २८ मार्च रोजी जीवननगरात घडली. याप्रकरणी व्यवस्थापक नारायणसिंग सरदारसिंग ठाकूर (४०) यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने योगेश गोपाल तिवारी (३५, रा. नंदनवन कॉलनी) यांच्या घरातील फ्रिजवरुन दोन मोबाईल चोरुन नेले. ही घटना १८ मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे करीत आहेत.