जळगाव शहरातील छ. शिवाजीनगर पुलावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलावर दोन दुचाकींच्या धडकेत महावितरण कंपनीचा वायरमन गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी दि. २० फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान विजय कोळी (वय २३ रा. कांचन नगर, जळगाव) हे महावितरण कंपनीत वायरमन म्हणून ते नोकरीला आहे. बुधवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता समाधान कोळी हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएन ६०२८) ने शिवाजी नगर उड्डाणपुलावरून जात होते. तेव्हा समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १२ ईएच ६०२८) ने जोरदार धडक दिली. या धडकेत समाधान कोळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी इंगळे ह्या करीत आहे.