जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयसमोर दुचाकीधारक (एमएच १९ बीडब्ल्यू ५३६९) हे स्वातंत्र्य चौकातून आकाशवाणी चौककडे जात होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुकीच्या मार्गाने येत असलेल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ जी ८७७७) वरील दुचाकीस्वराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला आहे.
त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.जयस्वाल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. जखमींवर उपचार सुरु होते.