बोदवड तालुक्यात मलकापूर रस्त्यावरील घटना
बोदवड-मलकापूर रस्त्यावर दुचाकींची धडक होऊन त्यात पुरुषोत्तम रामचंद्र अहिर (४५, रा. वाघोडा, ता. मलकापूर) हे ठार झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास झाला. यात प्रणव माळी (२३) आणि विजय माळी (२२, दोन्ही रा. वडजी, ता. बोदवड) हे जखमी झाले. रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात या दुचाकींचा अपघात झाला. जखमी दोघांना पुढील उपचार साठी जळगावला हलवण्यात आले आहे. तर बोदवड पोलीस स्टेशनला गणेश अहिर यांच्या फिर्यादीवरून समोरील दुचाकी वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.