भडगाव पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरातील एक दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कसून तपास करत भडगाव शहरातून दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी दोन गुन्हे उघड आले आहेत. तसेच त्यांनी तीन मोटरसायकली काढून दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सुनील शिवाजी गंजे ( वय ४१, रा. गिरणा कॉलनी, भडगाव) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार भडगाव पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात पोलिसांचा तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गोपनीय माहिती काढली. त्यात भडगाव शहरातील अमोल तुकाराम पाटील (वय २८, रा. भडगाव पेठ हल्ली मु. आदर्श नगर, भडगाव) आणि अमोल भागचंद परदेशी (वय ३५, रा. आझाद चौक, हल्ली मु. भोसले पार्क, भडगाव) यांनी चोरी केल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती.
दरम्यान, त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी गुन्ह्यातील चोरी झालेली दुचाकी आणि आणखी दोन गुन्ह्यातील दुचाकी काढून दिलेली आहे. यात भडगाव शहरातून त्यांनी फिर्यादीच्या दुचाकीसह आणखी एक दुचाकी एमएच १९ ए व्ही १४४६ ही चोरली होती. तसेच जळगाव रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतून एम एच १९ बी झेड १०७४ हे देखील पोलिसांना काढून दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेका किरण पाटील, निलेश ब्राह्मणकर, सुनील राजपूत, प्रवीण परदेशी, संभाजी पाटील आदींनी केली आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण पाटील करीत आहेत.