आ. भोळेंसह भाजप वैद्यकीय आघाडीची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात डॉक्टरांना खंडणी मागितल्याचे प्रकरण आणि सावदा येथील रुग्णालयाची तोड-फोड केल्याप्रकरणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीतर्फे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले. डॉक्टरांना संरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्यात यावे अशी धक्कादायक मागणी यांनी केली आहे.
निवेदन देतांना आ. सुरेश भोळे, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. नितु पाटील, डॉ. जीवन पाटील आदी उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “ ये हमारा एरिया है,आपको यहा हॉस्पिटल चलना है, तो हमे हप्ता देना पडेगा,नही तो अस्पताल बंद कर देंगे,” अशी धमकी भुसावळ मधील सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ.स्वप्नील कोळंबे यांना दि.१२ ऑक्टोबरला देण्यात आली आणि नंतर सतत धमकावण्यात आले.तरी यासंबंधी दि.२१ ऑक्टोबर ला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात “ खाकीचा धाक आता ओसरत चालला आहे…” अस काहीस चित्र तयार होत आहे,किमान प्रत्येक आठवड्यात खून,विनयभंग,दरोडा,चोरी,बलात्कार,मारामारी आदी घटना नित्य असून आता तर डॉक्टर मंडळींना दिवसाढवळ्या धमकी देणे.खंडणी मागणे नाही तर जीवे मारण्याची धमकी देणे इतपर्यंत मजल गेली आहे. आता सावदा येथील डॉ. सुनील चौधरी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली. यामुळे आपण सदर खंडणीचा गुन्हाबाबत जलद चक्र तपास यंत्रणा राबवून गुन्ह्रेगारांना ८ दिवसात अटक करण्यात यावी., सदर खटला जलद गतीने न्यायालयात चालवून संशयितांना कठोरपणे शिक्षा देण्यात यावी., डॉ.कोळंबे ,डॉ. चौधरी आणि परिवाराला शासकीय खर्चाने संरक्षण देण्यात यावे., भुसावळ शहरात मिलिटरी,पँरामिलीटरी,राखीव पोलिस यंत्रणा यांची मदत घेत हत्यारे,गावठी कट्टा,तलवारी आदी शोध मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी., सर्व डॉक्टर मंडळींना स्वरक्षणार्थ हत्यारे वापरण्याची कायदेशीर परवानगी द्यावी.
अश्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे. येत्या ८ दिवसात संशयित खंडणीखोरांना पकडावे अन्यथा संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असाही इशारा निवेदनात भाजप वैद्यकीय आघाडीने दिला आहे.







