जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील प्रतापनगर मधील अँग्लो उर्दू विद्यालयाजवळ असणाऱ्या साईलीला हॉस्पिटल येथे ‘डॉक्टर्स डे ‘ निमित्त १७ सहकाऱ्यांनी रक्तदान करून आपले योगदान दिले. रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते प्रत्येकाने केले पाहिजे असे आवाहन संचालक डॉ. भूषण झंवर यांनी वेळी केले.डॉ. सुनील तायडे, डॉ. निलेश लाठी, डॉ. संजय पाटील , डॉ. गजानन पाटील , डॉ. शरद शिंदे , भीमा बाविस्कर ,विजय राठोड सलीम तडवी , पंडित निकम , दीपक सोनवणे , सुरेश वाघ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे सहकार्य लाभले.