जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील शिरसोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डिमार्टसमोरील रस्ता चिखलाने भरलेला असून मध्यभागी डिव्हायडर चिखलाने भरलेला आहे.मात्र तो दिवसा तर नाहीच मात्र रात्रीही योग्य दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने तो जीवघेणा ठरत आहे.
यामुळे लहान मोठे अपघात याठिकाणी होत असतात दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी नवी कोरी कार अपघातग्रस्त होऊन तिचे हजारोंचे नुकसान झाल्याची घटना घडली. त्यामुळे याठिकाणी महापालिकेने या ठिकाणी दिशादर्शक फलक लावल्यास तसेच रात्रीच्या ठिकाणी रिफ्लेकटर लावल्यास लहान मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळणार नाही .