पाचोरा (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील जोगेश्वरी आय टी आय विद्यालयात दिव्यांगांसाठी मोफत प्रवेशाचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण संस्थेत तारतंत्री आणि वेल्डर कम फेब्रिकेटर या दोन अभ्यासक्रमांसाठी प्रत्यकी २५ अश्या एकूण ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
यासाठी विद्यार्थी किमान आठवी ते दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था संस्थेतर्फे वसतिगृहात करण्यात येणार आहे. तरी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी आयटीआय कोर्सेससाठी प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य के. आर. तोमर व वसतिगृह अधीक्षक विलास लोखंडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (9423155093 /9518345362) या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.