मंडळींचे घेतले आशीर्वाद
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील टाकळी, पिंपरखेडा, कोदोली, भागदरा, मोयगाव, हिवरी, हिवरखेडा, जांभूळ वडगाव, वाकोद आदी भागात महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे दिलीप खोडपे सर यांनी प्रचार केला. प्रचारात त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून वृद्धांचा आशीर्वाद मिळाला आहे.
प्रचारात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, उद्योजक आबासाहेब पाटील, विश्वजीत मनोहर पाटील,सागर कुमावत व स्थानिक कार्यकर्ते आदी. दौऱ्यात सहभागी होते. तालुक्यात अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या गावांच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून व्हिजन घेत काम करणार आहे. पूर्वी मूलभूत सुविधाअभावी त्रासलेल्या या भागांमध्ये आता मजबूत रस्ते आणि सार्वजनिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी माझा संकल्प आहे, असे सांगून उमेदवार दिलीप खोडपे सर म्हणाले, मी राबविणार असलेले प्रकल्प फक्त विकासाचे प्रतीक नाहीत, तर तालुक्यातील सर्व गावात समृद्धी आणण्याचा माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन दिलीप खोडपे सर यांनी केले.