धुळे ( प्रतिनिधी ) – येथे पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत साडे सात लाख रूपयांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली होती या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी भुसावळचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसरातील हॉटेल रेसिडेन्सी जवळ थांबलेल्या तरुणाकडे बाऊन शुगर असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने छापा टाकला. यात भुसावळ येथील राजू उर्फ सय्यद शेरू नामक संशयितास ताब्यात घेत ५०० ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीस पथकाने जप्त केलेले ब्राऊन शुगर जळगाव अथवा भुसावळ येथून आणल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चाळीसगावरोड परिसरातही या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गांजाची रिक्षातून वाहतूक करणार्या दोघांना ताब्यात घेण्यात आले मोहाडी व चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.







