चोपडा ग्रामीण पोलिसांची बोरअजंटी गावाजवळ कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) :- येथील चोपडा ग्रामीण पोलिसांनी बोरअजंटी गावालगात वनविभागाच्या नाक्यावर सापळा लावून धुळ्याच्या तरुणांकडून २ गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस असे जप्त केले. यावेळी अवैध शस्त्र वाहतूक करणाऱ्या २ जणांना अटक करून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश टाक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, चोपडा-वैजापूर रस्त्यावर दोन्ही धुळे येथील तरुण गावठी कट्टे घेऊन मोटरसायकलने प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बोरअजंटी गावालगात वनविभागाच्या नाक्यावर सापळा रचण्यात आला. या कारवाईवेळी दोघांकडून ५० हजार रुपयांचे २ गावठी कट्टे, ११ हजार रुपये किमतीचे ११ जिवंत काडतुसे, मोबाईल आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचं उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. याप्रकरणी पोकॉ तिरुपती खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जयेश सुरेश धापटे (वय २२, रा. सहजीवन नगर, धुळे) आणि फतेसिंग मिलनसिंग भादा (वय २०, रा. मोहाडी ता. धुळे) यांच्या गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.